Introduction to Service Sectors (Part 1)

            सेवा सुविधा भाग १ 

प्राजक्ता ताम्हणकर 

 • परिचय

    आपण या अभ्यासक्रमा मध्ये सेवा क्षेत्रातील वेगवेगळ्या पायाभूत माहितीचा अभ्यास करणार आहोत. उदा. सेवा क्षेत्रातील भूमिका, जबाबदारी आणि कौशल्य. या मध्ये आपण सेवा क्षेत्रातील समाविष्ट असलेल्या संबंधित परिस्थितीचा अभ्यास करु.

 • सेवा क्षेत्रातील कृषी उद्योग

   अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याचे नाव धोंडिबा होते. तो पारंपारिक पद्धतीने शेतीविषयक कामे करत असत. उदा. नांगर,स्वतः आणि बैलच्या मदतीने शेती करायचा.त्याच्या पारंपरिक शेती पद्धतीमुळे त्याची कमाई कमी असायची.. त्या कमाईतुन तो कुटुंबला आनंदी ठेवायचा.त्याचा मुलगा, काशिनाथ, त्यांने  गावातून शालेय शिक्षण गावाजवळच्या एका शाळेत पुर्ण केले व आपल्या शाळेच्या शिक्षकाच्या सल्ल्याने एक लहान उत्पादन कंपनीमध्ये प्रशिक्षणघेण्याचा व काम करण्याचा सल्ला घेतला.

   काशिनाथ देखील शेतीच्या कामामध्ये धोंडिबाला मदत करायचा. त्याविषयी इतर शेतकर्यानबरोबर चर्चा करायचा. काशिनाथ तंत्रज्ञानाचा वेग व त्याचे महत्वसमजले. काशिनाथ शेतीसाठी ट्रेंक्टरचा वापर करू लागला. काशिनाथने शेतीचे उत्त्पन चांगल्या प्रकारचे येण्यासाठी विविध बी-बियाण्यांचा वापर करू लागला.त्याचा परिणाम त्याला शेतीचे चांगले उत्त्पन प्राप्त झाले.परिणामत: शेतीपासून उत्पादनाची निर्मिती पद्धत सुधारली.

   काशिनाथने आधुनिक पद्धतीचा मोबाईल, विद्युत मोटारचा वापर करून विहिरीतून पाणी खेचण्यासाठीचे यंत्र वापरायला सुरुवात केली. त्यासोबत त्याने बँकेत खाते उघडले व त्याचा वापर करण्यास सुरुवात केली.

   काही वर्षानंतर काशिनाथचा मुलगा गणेश याने शालेय शिक्षण पूर्ण करून त्याने कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना गणेश शेती विषयक कामामध्ये वडिलांना व आजोबाना मदत करत असे.

   त्यासोबत त्याने संगणक प्रशिक्षण घेतले व कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या स्तरावरतील बदल समजून घेतले. तंत्रज्ञानामुळे बदलत्या जगातील बदलाचा तो साक्षीदार होता. उदा.औद्यागिक दुग्धालय, फुलझाडांची शेती, पोल्ट्री,रेशमी किड्यांची जोपासना इ.

    ‘किसान कॉल सेंटर’ च्या मदतीने सरकारी योजनांच्या संबंधिची माहिती गणेश ला घरबसल्या मिळू लागली. चमत्कारिक घटना गणेशने काशीनाथला सांगितली ती म्हणजे बँकेत पैश्याच्या व्यवहारासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. ऑनलाईन देवाणघेवाण होऊ शकते.

    आठवडे बाजारात शेतीच्या व्यवहार उत्पादनाची विक्री होते हे गणेशला लक्षात आले. जिल्हा पातळीवर उत्पादनाची विक्री हि चांगल्या गुणवत्तेने होते.

   त्याच्या आजोबांना धोंडिबाना अभिमान वाटत होता. ते साक्षीदार होते कृषी क्षेत्राचे रुपांतर औद्योगिक क्षेत्रात होताना.

 • सेवा सुविधा

रमेश हा शाळकरी मुलगा होता. त्याचा मोठा भाऊ सुरेश उच्च महाविद्यालयीन मुलगा होता. रमेश  खूप प्रकारचे प्रश्न सुरेशला विचारत. आणि सुरेश त्या प्रश्नांना चांगल्याप्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असे.

   शालेय व विद्यालयीन सुठ्ठीच्या दिवशी रमेशला आणि सुरेशला बाहेर जायचे होते. सुरेश ने त्याला सांगितले कि, त्याच्याकडे भरपूर गोष्टी करण्याची यादी आहे आणि रमेश थकू शकतो. परंतु रमेशने ऐकले नाही आणि दोघे हि बाहेर पडले.

     त्यांच्या मार्गात त्याची (रमेशची) शाळा दाखवली. तो म्हणाला कि चांगल्या शाळेत असल्याने रमेशच्या संकल्पना स्पष्ट झाल्या. रमेश म्हणाला कि त्याची शाळा उत्कृष्ट आहे. सुरेश म्हणाला आता बाजारात विविध सेवा पुरवणारे आहेत.

    रमेशला काही विचारायचे होते. परंतु सुरेशला इतर देशाच्या दुसऱ्या भागात व्यवसाय चालवत असलेल्या काकांचा फोन आला. त्याचे काका म्हणाले कि त्यांच्या मित्राला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि सुरेशने तेथे जाऊन त्यांना पहावे.

नंतर ते दवाखान्यात गेले. सुरेशने काकांच्या नातेवाईकाना वैद्यकीय विमा काढला आहे का अस विचारले.त्याने नंतर विमाएजंटला शोधला आणि त्याने विमा संबंधित माहिती घेऊन दवाखान्याला पुरवली. रमेश भूखेलेला वाटला. त्यामुळे सुरेश त्याला दवाखान्याच्या खानावळीत घेऊन गेला.

सुरेशने MPSC/UPSC च्या प्रशिक्षण शिकवणीच्या संबंधीतली चौकशी केली.त्यानंतर रमेश आणि सुरेश ने संथेच्या सल्लागाराला भेट देली. आणि त्यानी MPSC/UPSC माहिती करून घेतली.

    नंतर पुढे जाऊन रमेश म्हणाला कि तो खूप थकलेला आहे. त्यामुळे सुरेश ने ठरवले की, रमेशला घरी सोडून परत यायचे. वाहनात पेट्रोल कमी असल्यामुळे तो पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यास गेला. सुरेशने रक्कम क्रेडीट कार्ड ने भरली. रमेश त्याला विचारतो  तू कॅश देऊन का पैसे पे  करत नाही

 नंतर तो ATM जवळ थांबतो आणि पैसे काढतो. रमेश सुरेशला  विचारतो  जर माझे खाते या बँकेत असेल तरच मी पैसे काढू शकणार ना  सुरेश त्याला म्हणतो तू कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढू शकतो.

सुरेश ने त्याला घरी सोडले आणि पुन्हा तेच्या कामाला परत गेला. शाळेला सुट्टी असली तरी या सुट्टी मधला अनुभव हा रमेश साठी सर्वात मोठा होता.

 • Understanding Front Office Management ( आपण यामध्ये कार्यालय व्यवस्थापन समजून घेणार आहोत )
 • Roles in Front Office Management (कार्यालय व्यवस्थापन भूमिक)

१.आरक्षण एजंट

२. कार्यालय व्यवस्थापक

३. रिसेप्शनिस्ट

४.दूरध्वनी चालक

५.रोखपाल

६. सुविधा

 • Responsibilities (जबाबदारी)
 • अतिथी ना माहिती प्रदान करणे.
 • चेक-इन आणि चेक-आउट चा रेकॉर्ड ठेवणे.
 • आरक्षण संबंधित क्रियाकलाप.
 • इनकमिंग कॉलना उत्तर देणे.
 • इनकमिंग व आउटगोइंग कॉलचे रेकॉर्ड ठेवणे.
 • अतिथी म्हणून आलेले तसेच कार्यालयीन कर्मचार्यांना सुविधा देणे.
 • Responsibilities (जबाबदारी)
 • कार्यालय व्यवस्थापन बजेट तयार करणे.
 • व्यवस्थापन आणि कर्मचारी किंवा कर्मचार्याशी समन्वय साधणे.
 • पैसे हाताळणे.
 • पैसे प्राप्त करणे.
 • अतिथीचे स्वागत /अभिवादन.
 • Skills Needed For Front Office Management

(आतिथ्यक्षेत्रातील कार्यालय व्यवस्थापना मध्ये आवश्यक असणारी कौशल्ये)

 • चांगले संभाषण
 • उत्साह
 • संगणक ज्ञान
 • निर्णय
 • सूचना
 • सक्रिय ऐकणे
 • स्वयंप्रेरिक्ता
 • Understanding Front Office Management of a Hotel (हॉटेलकार्यालय व्यवस्थापन समजून घेणार आहोत.
 • Background (पार्श्वभूमी)

       समोरील कार्यालय हे ग्राहकांच्या संपर्कासाठी असलेले आद्योगिक विभागीय कार्यालय आहे. हॉटेल उद्योगात, एकही कार्यालय देखील (समोरील डेस्क म्हणून ओळखले जाते) हॉटेल उद्योगात संपर्क कार्यालय महत्त्वाचे कार्य निभावत जाते.

      प्रशांत आपले भविष्य (करिअर) आदरातिथ्य उद्योगात सुरु करू पाहत होता. आणि तेथे त्याने जाण्याचे ठरवले. तसेच त्याने हॉटेल व्यवस्थापन संस्था शोधून काढतो. त्या संस्थेत (हॉटेल उद्योगात) संस्थेबद्दल माहिती देणाऱ्या मुलीने त्याचे स्वागत केले माहिती देणाऱ्या मुलीने त्याचे त्याचे स्वागत केले.

        प्रशांतने तिला सांगितले की, त्याला कार्यालय व्यवस्थापन जाणून घेण्याची इच्छा आहे. ती त्याला समन्वयक कडे घेऊन गेली. समन्वयकांनी त्याला कोर्स बद्दलची माहिती सांगितली. प्रशांतने त्यांना त्या संबधितली  उदाहरणे सांगायला सांगितले. समन्वयकांनी त्याला समोरील कार्यालय व्यवस्थापनाचे उदाहरण दिले. उदा. पाहुण्याचे स्वागत, राहण्याची व्यवस्था, पाहुण्यांना भेटणे आणि अभिनंदन करणे, राखीव आयोजन, खोली देण्याच्या वेळ आणि परत घेण्याच्या वेळ तपासणे, हमाल सेवेचे आयोजन करणे, सुरक्षाव्यवस्था आयोजन करणे,ग्राहकांना संदेश पाठवणे इ.

    समोरील कार्यालय आणि आलेल्या पाहुण्याना सेवा देणे हा हॉटेलचा महत्वाचा भाग आहे. जसे की, हॉटेल चालकाचे मूळ हे पाहुण्यांचे समाधान आणि हॉटेलचे आणि ब्रँडच्या यशासाठी हा विभाग सातत्याने गंभीरपणेकार्यरत असतो.

        हे कार्यालय व अतिथी सेवा विभाग ग्राहकांच्या सतत संपर्कात असतो आणि तसेच हॉटेल मधील विविध विभागातील असुरक्षितता बघणे. आदर्श ग्राहक सेवा व आदर्श कार्यालय ग्राहकाची सेवा हि उत्कृष्ट भावना निर्माण करणारी असते.

           जेव्हा घरापासून दूर आलेल्या पाहुण्याची किवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करून आलेल्या पाहुण्यांच्या आरामदायक सोय करण्याचे ते पाहत असतात. व्यवस्थापन कार्यालय हे ग्राहकांच्या आवश्यक गरजा आणि आशेच्या पलीकडे सहकार्य करतात.

       जेव्हा अतिथी येतात तेव्हा त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संवाद कौशल्य, अष्टपैलू गुण, समूहात काम करण्याची आवड, चांगले काम करणे व व्यवस्थापन कार्यालय आणि सहकारी अतिथी चा अनुभव वृद्धिगत करण्यासाठी मार्ग शोधात असतात. प्रशांतला समजले की संवाद हा हॉटेलचा प्रमुख भाग आहे.

 • Cross Cultural Management In Service Sector (सेवा क्षेत्रातील सांस्कृतिक व्यवस्थापन)
 • (हॉटेल्स मध्ये ग्राहकांच्या विशिष्ट मागणींची काळजी घेणे)
 • Background (पार्श्वभूमी)

सेजल  ही हुशार मुलगी आहे. ती राष्ट्रीय स्थरावरील कंपनीत काम करते. तिच्या नवीन कामाची जागाही परदेशात आहे. सेजल ही जैन धर्माची आहे. ती शाकाहरी आणि तसेच कांदे, लसून, बटाटे, इ. खात नाही.

तिला स्वयंपाकासाठी अपार्टमेंटचा काही हिस्सा दिला गेला. परंतु  एक  आठवडाभर ती जेवायला हॉटेल मध्ये  जात असे. सेजल ला तिच्या खाण्याविषयी ते हॉटेल पाहून काळजी वाटत असे. त्यामुळे तिने हॉटेल चेकिंग केले.

सेजल ने विचारले की जर तिला शुद्धशाकाहरी जेवण कांदे, बटाटे, लसून, इ. शिवाय मिळू शकते का? हॉटेल मधील रिसेप्शनिस्ट तीचे स्वागत करून तिला सांगितले की हॉटेल मध्ये जैन जेवण मिळू शकते.

सेजलने आश्चर्यचकित होऊन विचारले की तिला जैन जेवण हवे आहे असे माहिती कसे पडले. चेहऱ्यावर समाधानकारक हास्य करून रिसेप्शनिस्ट म्हणाली की, त्यांना सर्व प्रकारचे ग्राहक मिळतात. विविध सांस्कृतिक पारंपारिक व्यपस्थापन हा महत्वाचा भाग असून त्यांची सेवा हा आमच्या सेवेचा महत्वाचा भाग आहे.

सेजलने आनंदात जेवण केले आणि खाण्याची सोय आवडली आणि निघताना तिने हॉटेल व्यपस्थापनाचे आभार मानले. रिसेप्शनिस्ट म्हणाली मॅडम आम्ही आमच्या आदरणीय ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पुरवण्याची काळजी घेत असतो.

 • Understanding Education As A Service Sector (शिक्षण क्षेत्रातील सेवा समजून घेणे)
 • शिक्षण क्षेत्रांतील भूमिका
 • सल्लागार
 • शिकत सुविधा
 • विद्यार्थी सल्लागार
 • विद्यार्थी सुलभता कार्यकारी
 • शिक्षण क्षेत्रांतील आवश्यक कौशल्य
 • सहानभूती
 • आत्मविश्वास
 • चांगले संभाषण
 • शिक्षण क्षेत्राबद्दल सखोल ज्ञान
 • विवध अध्यापन पद्धती आणि तंत्रचा वापर

      An Aspiring Student Seeks Guidance On Preparing For Being An Airhostess (एक महत्वाकांक्षी विद्यार्थीनी एयरहोस्टेस होण्यासाठी मार्गदर्शन मागते आहे)

        रीनाची एयरहोस्टेस बनण्याची इच्छा होती.ती लहान शहरातून आली होती तरीही तिची एयरहोस्टेस बनण्याचे स्वप्न कायम होते.ती मुलाखतीत पास झाली.परंतु अंतिम फेरीत पोहचू शकली नाही. आत्मपरीक्षण करण्यासाठी तिने  व्यक्तिमत्व विकासाचा क्लास लावण्याचा निर्णय घेतला.

      ती त्या संदर्भात सल्ला घेण्यासाठी अकॅमी मध्ये जाते.

रिना:-  नमस्कार,

सल्लागार:- शुभ दुपार

 मी तुमची कशाप्रकारे मदत करू शकते ?

रिना:- मला विमानातील प्रवाशांची देखभाल करणारी सेविका व्हायचं आहे. परंतु एकदा मला मुलाखती मध्ये नाकारले गेले आहे.

सल्लागार:- कोणत्या स्तरावर तुम्ही नाकारल्या गेल्या आहात’?

रिना:- मुलाखत

सल्लागार:- ठीक आहे. तुमची आमच्याकडून काय अपेक्षा आहे.

रिना:-  मला मुलाखत पास होण्यासाठी कोणता कोर्स करायचा आहे. त्यात मी गोंधळली आहे. तसेच मी व्यक्तिमत्व विकास क्लास आणि संवाद कौशल्य या कोर्स बाबत सुद्धा गोंधळलेली आहे.

सल्लागार:- तुम्हाला या कोर्सची गरज आहे असे का वाटते.

रिना:- मला असे वाटते की, मी स्वतःला मांडण्या मध्ये कमी पडते. मी विश्वासू व्यक्ती आहे. परंतु जेव्हा मी मुलाखत देते तेव्हा अस्थिर होते. म्हणून मला वाटते की हे आव्हान पूर्ण करण्यासाठी हे कोर्स मदत करतील.

सल्लागार:- माझ्या माहितीनुसार हि समस्या तुमच्या व्यक्तिमत्वची नाही, परंतु तुम्हाला तुमच्या व्यवसायात लोकांनामध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे आणि व्यक्तींना जीवनातल्या प्रत्येक पायरीत लोकांना हाताळता आले पाहिजे.

रिना:-  होय, तुम्ही बरोबर आहात.

सल्लागार:-  आता समजले मला नेमकी कशाची गरज आहे ?

रिना:- हे बरोबर आहे. याची किती फी आहे ? आणि कधीपासून मी सुरु करू शकते?

सल्लागार:- आमच्याकडे मुलाखत कौशल्याचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम फक्त त्याच लोकांसाठी त्याचं लक्ष ज्यांना मुलाखतीसाठी बसण्याचे आहे.या दोन महिन्यात आम्ही तुमच्याकडून सर्व प्रकारच्या मौखिक मुलाखतीची तयारी करून घेतली जाते.

रिना:- धन्यवाद, मी माझ्या पालकाशी ह्या संबंधीची चर्चा करून तुम्हाला कळवते.

सल्लागार:-  तुम्ही वेळेवर आला आहात आमची नवीन तुकडी ह्या महिन्याच्या अखेरीस सुरु होते आहे. इतर काही माहितीसाठी तुम्ही माहितीपत्र वाचू शकता.

तुमचा दिवस आनंदी जाओ…!

 

Advertisements

One thought on “

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s