प्रदर्शनातून विक्रीच्या संकल्पना

ज्ञानेश्वर यादव

स्वप्ना आपल्या टीमला बैठकीसाठी संपर्क करते.

स्वप्ना : शुभ दुपार सर्वांना, हा सुनील आहे आपल्या डिस्पले विभागामधून. जसं कि आपण उद्यापासून आपला दिवाळी सेल चालू करत आहोत, आपल्याला सर्व कपाट, विक्रीच्या वस्तू व्यवस्थित करून घ्याव्या लागतील. सुनील या सर्व पद्धतीचे नियोजन करेल आणि आपल्याला आपली कपाटे आणि विक्रीच्या वस्तू कशा मांडायच्या आहेत याविषयी मार्गदर्शन करेल.

सुनील : मागच्या वर्षीचा आपला दिवाळी सेल खूप छान झाला होता. पण आपल्याला यावेळी मोठे टार्गेट आहे. मला खात्री आहे कि आपण मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी नक्कीच चांगले करू. आपल्याकडे विक्रीच्या वस्तूंची नवीन रेंज आलेली आहे आणि आपल्याला हे ग्राहकांच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे जरी ते नुसते चक्कर मारून गेले तरी.

सुनील : ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या मला कराव्या असे वाटते आणि ते करण्यासाठी मला तुमची मदत लागेल जेणेकरून कि त्यानुसार आपल्याला सर्व काही व्यवस्थित लावता येईल. हा आपला पुढचा विक्री भाग आहे. येथे आपण ३ राउंडर्स मागच्या बाजूला आणि २ A फ्रेम मध्यभागी ठरविलेल्या विक्री भागात लावूयात.

रेगी : होय नक्कीच. या T फ्रेम्स कोठे मांडाव्यात?

सुनील : मी ते सांगणारच होतो. आपल्याला पुतळे अशा प्रकारे ठेवावे लागतील कि प्रवेश करायच्या भागातून ते दिसतील. आपण T फ्रेम्स एका बाजूला ठेवूत, ४ वाटरफाल कपाटे भिंतीला लागून आणि ३ वे कपाटे पुढच्या बाजूला ठेवूयात.

आकाश : आपण बरोबर करत आहोत का? आपण वाटरफाल कपाटे येथे ठेवूयात का?

सुनील : हो. ते एकदम योग्य राहील. तुझे हे पूर्ण झाल्यानंतर कृपया राउंडर्स आणि फिरत्या कपाटांवर ठेवायच्या वस्तू घेऊन ये.

स्वप्ना : प्रत्येक कपाटावर विक्रीचा तपशील हवा. काही वस्तूंवर कमी करण्यात आलेली किंमत दिसली पाहिजे.

अनु : आपल्याला कसे कळेल कि नेहमीच्या विक्रीच्या वस्तू कोणत्या आणि कोणत्या वस्तू आपण कमी दरात उपलब्ध करून दिल्यात.

स्वप्ना : नेहमीच्या विक्रीच्या वस्तूंवर आपल्याला लाल खूप करायची आहे आणि कमी दारात उपलब्ध करून देण्यात आलेल्या वस्तूंवर आपल्याला निळी खुण करायची आहे.

अनु : मी ते करून घेईन. आपण वस्तू ब्रँड आणि विक्रेत्यानुसार वेगवेगळ्या कराव्यात का?स्वप्ना : चांगला प्रश्न आहे. नक्कीच, आपण विक्रेत्यानुसार वस्तू वेगवेगळ्या करू आणि प्रत्येक रांगेत आणि कापतात त्यांना बरोबर महत्व देऊ. आपल्या स्वतःचे ब्रँड प्रत्येक ठिकाणी उठून दिसायला पाहिजे. सुनील : जे मी पाहतोय त्यावरून मी आनंदी आहे. मला असे वाटते आपण योग्य मार्गावर आहोत. स्वप्ना : हो खरच. हे खूप छान दिसतंय. आपण लवकरच व्यापाराला तयार होऊ.

किरकोळ विक्रीतील कामे आणि जबाबदाऱ्या

किरकोळ विक्री प्रतिनिधीची कामे आणि जबाबदाऱ्या

परिस्थिती क्र. १

दीपा:मी आपल्याला मदत करू का?

ग्राहक: तुम्ही मला सांगू शकता का कि टूथब्रश, टूथपेस्ट, दाढी करण्याची क्रीम आणि डीओ मला कोठे मिळेल?

दीपा: नक्कीच! तुम्ही ७ नंबरच्या भागात गेलात कि तुम्हाला हव्या असलेल्या सर्व वस्तू तुम्हाला तेथे ‘टॉयलेट्रीज’ सेक्शन मध्ये मिळतील. खरतर,मी तुमच्यासोबत येते. मी तुम्हाला हवे असलेले ब्राण्ड लगेच मिळावे म्हणून तुमची मदत करते.

परिस्थिती क्र.२

ग्राहक: मी फुटबॉल खेळताना वापरण्याचे बूट शोधत आहे.तुम्ही……….

किरकोळ विक्री प्रतिनिधी: अच्छा नक्कीच! आपण पुढे जाऊयात जेथे आमचे फुटबॉल खेळताना वापरण्याचे बूट ठेवले आहेत. आमच्याकडे त्यात खूप छान प्रकार आहेत.

ग्राहक: ते माझ्या ८ वर्षाच्या मुलासाठी पाहिजे आहे. तो ८ नंबरचा बूट वापरतो.

ग्राहक: स्टडविषयी आपण काय सुचवता?

किरकोळ विक्री प्रतिनिधी: सर, प्लास्टिकचे स्टड लवचिक नसतात पण बिना गवताच्या पृष्टभागांवर वापरण्यासाठी ते एकदम योग्य आहेत. रबर स्टड गवती पृष्टभागांवर वापरण्यासाठी योग्य आहेत आणि ते खूप लवचिक असतात. ते जर बिना गवताच्या पृष्टभागांवर वापरले तर खूप लवकर फाटू शकतात. दोन्ही तुम्हाला रु. ६०० ते ८०० च्या आत मिळून जातील. काढून ठेवण्याचे स्टड हे व्यावसायिक खेळाडू वापरतात आणि ते कसल्याही पृष्टभागांवर वापरता येतात. ते रु. २००० ते ३००० च्या दरात उपलब्ध आहेत. आपण कोणते जरी घेतले तरी काहीच हरकत नाही कारण आम्ही जे ब्राण्ड ठेवतो ते सर्व सुरक्षित आहेत.

ग्राहक: होय खरच! मला फुटबॉल खेळताना वापरण्याचे बुटांच्याविषयी इतक सार माहिती न्हवत. आणि हो मी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी करत होते कारण ते इतके स्थिर दिसत नाहीत. माहितीकरिता धन्यवाद. मला वाटते प्लास्टिक स्टड योग्य राहतील.

किरकोळ विक्री प्रतिनिधी: मी तुम्हाला ८ नंबरचा बूट शोधून देते. जर तो त्याला व्यवस्थित बसला नाही तर आम्ही तो तुम्हाला त्याला योग्य बसेल अशा बुटाने बदलून देऊ आधी घेऊन गेलेला बूट बाहेर न वापरता आणून परत आणून द्यावा लागेल.

ग्राहक: छान!

वेगवेगळ्या परिस्थितीतील ग्राहक सेवा

  • प्रत्येक जण चुका करतो, तुम्हीसुद्धा:

आदर्श जगात, कोणीही चुका करणार नाही आणि प्रत्येकजण आनंदात असेल.

पण खरतर, हे आदर्श जग नाही. खरतर, किरकोळ विक्री क्षेत्रातील बऱ्याच गोष्टी या काही समजावर आधारित आहेत, पण वातावरण हे नेहमीच विनाखात्रीचे असते. हे शक्य आहे कि तुम्ही चुका कराल.

  • प्रामाणिकपणा हा तुमच्यावरचा विश्वास प्रतीत करतो:

जेव्हा तुम्ही कबुल करता कि तुम्ही चूक केली आहे, तेव्हा अडचण स्वीकारण्याची तुमची इच्छा आहे असे दिसून येते. बहुधा आपल्याला, बचावप्रधान भांडणे ऐकायला मिळतात जेव्हा चुका होतात. जेव्हा तुम्ही काहीतरी चूक करता ज्यामुळे ग्राहकाचे नुकसान होते, तेव्हा खात्री करा कि ग्राहकाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तुमच्याकडे काही उपयायोजना आहे. बऱ्याच परिस्थितीत, सजग राहणे आणि खात्री करणे कि अशी चूक पुन्हा होणार नाही हेच आपली चूक प्रामाणिकपणे कबुल करण्यापेक्षा खरे निराकरण आहे.

  • खंबीर भूमिका आणि आक्रमक भूमिका यातील फरक जाणून घ्या:

खंबीर भूमिका हि बहुधा आक्रमक भूमिकेच्या स्वरुपात समजली जाते. खाली दिलेली उदाहरणे विचारात घ्या, ग्राहक फाटलेली जीन्स घेऊन येतो आणि म्हणतो कि त्याने जेव्हा ती कडून पहिली तेव्हा ती फाटलेली होती. तो तुम्हाला त्याचे पैसे परत करायला सांगतो. भरपूर चर्चा केल्यानंतर आणि स्पष्टीकरण दिल्यानंतरही ग्राहक आपल्या पैसे परत करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या पर्यवेक्षकाला बोलावता आणि तो ग्राहकाला तुम्ही सांगितलेल्या गोष्टी परत सांगतो कारण कुठल्याही परिस्थितीत तुम्ही वापरलेली वस्तू परत घेऊ शकत नाही.

केस स्टडी:

परिस्थिती:

ग्राहक: मला माहित नाही तुमचे नियम काय सांगतात!!! मला माझे पैसे परत पाहिजेत नाहीतर मी खात्री करेन कि तुमचा धंदा कायमचा बंद होईल. तुम्ही मला मूर्ख बनवू शकत नाही. तुम्ही अशा प्रकारे माझे पैसे चोरू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही मला माझे पैसे परत देत नाहीत तोपर्यंत मी येथून हलणार नाही. तुम्ही मला माझे पैसे परत द्या नाहीतर ……………………………………….

प्रतिसाद क्र. १:

विक्री सहकारी: तुम्ही मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहात का? पहिल्यांदा तुम्ही वस्तू परत करण्याचे नियम न वाचण्याची चूक केली आणि आता तुम्ही मला घाबरवण्याचा प्रयत्न करताय. मी तुम्हाला दाखवतो कोण कुणाला कायमच बंद करतो ते.

प्रतिसाद क्र. २:

विक्री सहकारी: मी समजू शकतो कि तुम्ही अस्वस्थ आहात. परंतु मी सर्वकाही केलंय जेणेकरून कि तुम्हाला समजेल कि आम्ही आपली वापरलेली जीन्स परत का घेऊ शकत नाही ते. जर तुम्हाला येथे दिवसभर वाट पाहायची असेल तर ते तुमच्यावर आहे, पण माफ करा मी तुमचे पैसे परत करू शकत नाही.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s